file photo 
नागपूर

खंडणीखोर कडवचा आणखी एक कारनामा उघड 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेनेतून हकालपट्‌टी करण्यात आलेला खंडणीबाज मंगेश कडवचा आणखी एक कारनामा उघडकीस आला. मंगेशने बोगस दस्तऐवजाद्वारे एका बॅंकेतून 50 लाखांचे कर्ज घेतले असून, बॅंकेतील अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाचे कोणतेही स्रोत न तपासता हे कर्ज दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. 

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, यात आता बॅंकेचे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. लवकरच पोलिस त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कडव प्रकरणातील अडकेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडव हा सात दिवसांपर्यंत गुन्हे शाखा पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. चौकशीदरम्यान त्याने एका बॅंकेतून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे दस्तऐवज पोलिसांना आढळले. बॅंकेतील अधिकाऱ्यांच्या मदतीने कडव याने बोगस दस्तऐवजाद्वारे हे कर्ज घेतले. यात बॅंकेतील अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाचे कोणतेही स्रोत तपासले नसल्याचेही समोर आले. त्यामुळे बॅंकेतील अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. 

मंगेश कडव याच्याविरुद्ध आतापर्यंत खंडणी व फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल झाले. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान गुन्हेशाखा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कडव याने केलेले भूखंडाचे करारनामे, कोरे धनादेश व संपत्तीशी संबंधित दस्तऐवज जप्त केले. या दस्तऐवजाच्या तपासणीदरम्यान त्याने बॅंकेतून कर्ज घेतल्याचे समोर आले. मंगेशवर आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT